किती रुपये दिले तर तुम्ही फेसबुक वापरायचे सोडाल?

२ अब्ज पेक्षा जास्त वापरकर्त्यांच्या मोठा पसारा असलेलं फेसबुक नेहमीच काही नाही कारणामुळे वादात सापडत चाललं आहे. आधी अकाउंट आपोआप हॅक होण्यामुळे, तर कधी डेटा चुकून लीक झाल्यामुळे. आता तर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ च्या अवहालानुसार तर या वादाने कळस गाठला आहे. फेसबुकने ऍमेझॉन सारख्या काही खाजगी कंपन्यांना युजर्सची माहिती विकली आहे आणि तेही युजरच्या परवानगीशिवाय. हि बातमी जगभरात वाऱ्यासारखी पसरली आणि त्या नंतर अनेक ‘सुशिक्षित’ लोक फेसबुक ला रामराम करण्याची भाषा करू लागले. त्यातील अनेक जणांनी फेसबुक सोडून इतर माध्यमांचा मार्गही धरला.

आपल्या आत्ताच्या इंटरनेटवर अवलंबून असलेल्या जीवनशैलीत ‘फेसबुक नाही’ हे कितपत रुचेल?
फेसबुक कडून जगभरात २ अब्ज पेक्षा जास्त यूजरना आपली सेवा दिली जाते आणि तीही अगदी मोफत. पण नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार समोर आले आहे कि फेसबुकच्या एका यूजर अकाउंट चे चालू राहण्याचे मूल्य साधारण एक हजार डॉलर म्हणजेच सत्तर हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. हे मूल्य फेसबुक यूजर्स च्या एका सर्व्ह मध्ये समोर आले आहे.

नक्की हा सर्व्ह काय होता आणि कोणी केला?
अमेरिकेतील टफ्ट्स विद्यापीठातील काही संशोधकांनी एक सर्व्ह केला आणि त्या तपशिलाचा अभ्या केला असते हे सत्य समोर आले. या संशोधकांनी समाजातील सर्व स्तरातील काही लोकांचा सर्व्ह केला जे नियमित फेसबुक वापरतात. त्या मध्ये सर्व वयोगटातील लोक होते, काही विद्यार्थी होते काही विविध व्यवसाय किंवा नोकरी करणारे होते. या सर्वांना फेसबुक अकाउंट बंद करायला सांगितले गेले आणि त्या बदल्यात काही रक्कम मागण्यास सांगितले. म्हणजेच यावरून तुम्हाला तुमच्या फेसबुक अकाउंट चे तुमच्या मते नक्की मूल्य किती हे सांगायचे होते. फेसबुक चे अकाऊंट कायमचे बंद करण्यासाठी वार्षिक रक्कम किती मिळावी हे त्यांना ठरवायचे होते.

सर्व्हमधून समोर काय आले?
सर्व्हे केलेल्या लोकांना आपापल्या फेसबुक अकाउंट चे योग्य मूल्य आणि किंमत यातील फरक कळावा म्हणून त्यांच्या समोर काही आर्थिक अडचणी उभ्या करण्यात आल्या. त्यातील काही विद्यार्थ्यांनी आपल्या फेसबुक अकाउंट चे मूल्य २५०० डॉलर्स पेक्षा अधिक सांगितले तर काही नोकरदार वर्गाने अगदी ३०० डॉलर्स पासून मूल्य सांगितले. त्यातील काही जण असे होते कि कितीही रक्कम दिली तरी फेसबुक वर्षभरासाठीच काय तर कधी बंद करणार नाही असे त्यांनी ठासून सांगितले.
म्हणजे यातूनच सरासरी १००० डॉलर्स हे मूल्य लोकांनी ठरवले त्यांचे फेसबुक अकाउंट वर्षभर बंद करण्यासाठी.

70,000 रुपये एक वर्षासाठी हि रक्कम खरंच योग्य आहे का?

फेसबुकचे बाजार मूल्य आणि त्यावर असलेल्या यूजरची संख्या तसेच स्थानिक पातळीवरील फेसबुकचे योगदान, या सर्वांचा विचार करता एका फेसबुक अकाउंट ची बंद करण्याची किंमत हि केवळ १९० डॉलर म्हणजे साधारण  सात हजार रुपये इतकीच आहे. लोकांचा वापर आणि फेसबुकचे असलेले व्यसन यामुळे लोकांच्या दृष्टीने आपापल्या अकाऊंचे मूल्य वाढले आहे. अमेरिकेच्या टफ्ट्स विद्यापीठाने केलेल्या सर्व्हे मधून ज्या किंमती समोर आल्या त्या वरून आपल्याला कळू शकत कि जगभरात असे अनेक लोक आहेत जे फेसबुक शिवाय जगू शकत नाहीत किंवा त्यांच्या दृष्टीनेफेसबुक अकाउंट ची किंमत हि खूप जास्त आहे. या सर्व्हे मध्ये सामील असलेल्या लोकांनी आपापले फेसबुक अकाउंट वर्षभरासाठी बंद केले आणि त्या बदल्यात त्यांना रक्कम हि दिली गेली.

अमेरिकेतील केनयोन कॉलेजमधील प्राध्यापक कॉरिगिन यांच्या म्हणण्यानुसार फेसबुक किंवा अन्य सोशल मीडिया याचा वापर मित्र आणि नातेवाईक एकत्र येण्यासाठी उत्तम झाला आहे, पण या माध्यमातून कोणी बक्कळ पैसे कमवून श्रीमंत झाला आहे असे मिळणे कठीण. किंवा एखाद्याची उत्पादन क्षमता वाढली आहे असे सांगणारे पुरावेही नाहीत.”आम्हाला माहित आहे की फेसबुकवरुन लोकांना खूप काही मिळण्याची अपेक्षा आहे किंवा जर ते मिळाला नाही तर ते दररोज लाखो तास व्यथित करणार नाहीत. जी गोष्ट फुकट मिळते त्याचे मूल्य किंवा किंमत आपण कशी ठरवणार हे मोठे आव्हान आहे. “असे कॉर्रिगन म्हणाले. या संशोधनामुळे लोकांना त्यांचे खाते निश्चित कालावधीसाठी त्यांचे बंद करणे आणि सत्यतेने बोली लावणे तसेच त्याचा किती मोबदला आहे यावर विचार करण्याची प्रेरणा मिळाली.

गुगल चा अहवाल काय सांगतो ?
गुगल च्या रिपोर्टनुसार जेव्हापासून ‘फेसबुक डेटा लीक’ ची बातमी पुढे आली, तेव्हापासून गूगल वापरणाऱ्या किमान 40% लोकांनी “फेसबुक अकाउंट बंद कसे करायचे” याबाबत सर्च केलं आहे. यावरून आपल्याला कळेल की अनेक लोकांना फेसबुक वर खाते महत्वाचे आहे पण त्यापेक्षा खाजगी माहितीची सुरक्षाही तेवढीच महत्वाची आहे.

फेसबुक आणि त्याचे व्यसन –
तासंतास फेबूक खाली वर स्क्रोल करत बसणे असा काहींचा जणू छंदच असतो, आणि हाच छंद कधी व्यसनात बदलतो ते आपल्यालाही काळात नाही. अनेक जण असे आहेत ज्यांना दिवसातून एकदातरी फेसबुक उघडून बघितल्याशिवाय जेवण जात नाही किंवा रात्री झोप येत नाही. फेसबुकचा व्यावसायिक दृष्ट्या वापर करणारे अनेक आहेत त्यातून त्यांना आर्थिक लाभ असतो. पण कोणताही फायदा नसताना दिवसरात्र फेसबुक सारख्य सोशल मीडियावर वेळ घालवणे हे कितपत योग्य आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. तसेच आपल्या फेसबुक खात्याची किंमत आणि ते बंद करण्याचे आपल्या डोक्यातील मूल्य याचाही आपण सद्सद्विवेक बुद्धीने विचार करायला हवा.

Onkar Gandhe is a Cyber Security Expert, Branding Expert, Digital and Social Media Marketing Consultant, Digital Growth Hacker, Trainer, Author, Writer, Social Worker, Professor, Keynote Speaker, and a magnanimous Entrepreneur.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!