पबजी आणि बरच काही …

पबजी म्हणजेच ‘प्लेयर अन-नोन बॅटल ग्राऊंड्स’ हि गेम सध्या सर्वात जास्त खेळली जाणारी आहे. हि गेम अँडॉईड आणि आयओएस दोन्ही साठी चालते. कॉम्पुटर चे सुद्धा व्हर्जन उपलब्ध आहे पण त्यात काही बदल आहेत. पबजी मोबाईल सर्वात जास्त लोकप्रिय गेम बनली आहे आणि सर्वात जास्त खेळली जाते आहे. नेट चालू करून, मोबाईल आडवा धरून , कानात हेडफोन घालून गल्लीबोळात मुले, मुली, माणसे हि गेम खेळताना दिसतात. नक्की हे पबजी आहे तरी काय ..?

पबजी नक्की काय आहे ?

पबजी हि गेम मूळ ‘ब्लुहोल’ या कंपनीने बनवली, त्याचे पबजी मोबाईल हे व्हर्जन ‘टेनसेंट मोबाईल’ कंपनीने बाजारात आणले आणि ते वाऱ्यासारखे पसरत गेले. जास्त करून पबजी अँड्रॉइड मोबाईल वर खेळले जाते. आणि हे अगदी फुकट उपलब्ध आहे. हि गेम डाउनलोड करण्यासाठी खूप मोठी आहे, (१ जीबी पेक्षा मोठी). परंतु एकदा डाउनलोड केली कि हि गेम आरामात खेळू शकता. यासाठी इंटरनेट आवश्यक आहे, आणि त्यातच खरी गम्मत आहे. हि गेम खेळताना इंटरनेट चा स्पीड चांगला असेल तर गेम एकदम व्यवस्थित चालते. तसेच यासाठी जास्त इंटरनेट खर्च होत नाही. इंटरनेट चा स्पीड जरा कमी असेल तरी हि गेम अडकत नाही, हे या गेम चे विशेष.

पबजी ची गोष्ट काय आहे ?

पबजी या गेम मध्ये ३ मुख्य जागा आहेत, त्याचे नकाशे आपल्याला दिसतात. त्यापैकी एक नकाशा निवडून आपण खेळायला सुरुवात करू शकतो. हे तीन नकाशे म्हणजे एक जंगल, एक वाळवंट आणि एक शहर असते. आपण यात एकटे खेळू शकतो किंवा दोघात खेळू शकतो किंवा चार जणांचा गट करून खेळू शकतो. आपल्याला आधी एका विमातून या जागेवर आणले जाते आणि आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण विमानातू उडी मारू शकतो. सगळे मिळून १०० जण एका वेळी खेळात असतात. बाकी सर्वांना मारून शेवट पर्यंत जिवंत राहायचे एवढीच या गेम ची मुख्य संकल्पना आहे.  शेवटी जिंकल्यानंतर ‘विनर विनर चिकन डिनर’ असा येणारा मेसेज बघण्यासाठी खेळाडू तरसलेले असतात.

आपण ज्या पद्धतीने खेळात जातो त्या नुसार आपल्याला पॉईंट्स मिळत जातात. गेमची लेवल वाढत जाते, तसेच काही विशेष नैपुण्य हि मिळवतात येते.

हे विशेष नैपुण्य मिळवण्यासाठी सर्वांमध्ये चढाओढ लागलेली असते.

या गेम साठी आपण आपले फेसबुक अकाउंट वापरू शकतो. तसेच आपल्याला आपला खेळाडू मुलगा हवा कि मुलगी ते ठरवता येत. तसेच आपण आपल्या पद्धतीने कपडे, केशरचना इत्यादी ठेऊ शकतो.

पबजी मध्ये सर्वांत लक्षवेधी गोष्ट कोणती ?

पबजी हि गेम खूप उत्तम बनवली आहे असे जवळपास सर्वांचेच म्हणणे आहे. या गेम चे विशेष म्हणजे यातील ग्राफिक्स आणि आवाज. सर्वोत्तम ग्राफिक्स देण्याचा प्रयत्न या गेम मध्ये  आणि ते सुद्धा मोबाईल साठी. बारीक बारीक गोष्टी सुद्धा अत्यंत स्पष्टपणे दिसतील अशी सोया केली गेली आहे, आणि त्यामुळेच गेमची खरी मजा येते. अगदी झाडाझुडपात, गवतात लपून बसलेला शत्रू आपल्याला नीट कळून येतो.

आवाज आणि इतर ध्वनी प्रभाव इतके योग्य वापरले गेले आहेत, कि शत्रूच्या पावलांच्या आवाजावरून तो कोणत्या दिशेने आणि किती लांबून येतो आहे ते समजते. तसेच गाडीचा आवाज, पाण्याचा आणि इतर अनेक आवाज या गेम मध्ये विशेष ऐकू येतात.

पबजी मध्ये विशेष असे काय आहे ?

पबजी हि गेम एकदा खेळली कि अजून एक दोन वेळा खेळू असा विचार मनात येतोच, आणि जास्त खेळात गेलो कि जणू त्याच व्यसनच लागत. या गेम मध्ये आपण जगभरातील खऱ्या लोकांशी ऑनलाईन खेळात असतो, आपण आपल्या मित्रांसोबत किंवा ओळखीच्या माणसांसोबत खेळात असलो तर मग काही मजा औरच.

गेम खेळत असताना आपण आपल्या ग्रुप मधील मित्रांशी बोलू शकतो, आणि तेही एकदम स्पष्ट.  पुढे कुठे जायचे कसे खेळायचे याविषयी एकमेकांना कमांड देऊ शकतो, यामुळे या गेम ची रंजकता अजून वाढली आहे. काही वेळा अनोळखी लोक आपल्या ग्रुप मध्ये खेळायला येतात, त्यावेळी त्यांच्याशी बोलत ओळखीही होतात.

पबजी गेमच्या अनेक ठिकाणी स्पर्धा भरवल्या जातात. आता काही दिवसांनी कॉलेजेस मध्ये डेज च वातावरण सुरु होईल तेव्हा हि पबजी गेम खूप धुमाकूळ घालेल हे नक्की.

पबजी या गेम ची जाहिरात चक्क टीव्हीवर सुद्धा लागते, गेम इतकी लोकप्रिय झाली आहे तरी त्यांच्याकडून हिंदीत जाहिरात केली जाते हे अजूनच विशेष.

पबजी च्या मागे संकल्पना कोणाची आणि कशी आली ?

ब्रेन्डन ग्रीन हा या पबजी गेम मागचा खरा चेहरा आहे. ब्रेन्डन ग्रीन हा मूळचा आयरिश छायाचित्रकार होता आणि त्याचा गेम तयार करण्याचा व्यवसायही नव्हता. पूर्वी आरमा २ या गेमच्या माध्यमातून तो गेम विश्वात आला आणि त्याने जणू क्रांतीच केली. आरमा २ गेम चे यश बघून ब्लुहोल कंपनीने त्याला सोबत काम करण्यास सांगितले, ब्रेन्डन ग्रीन चीही इच्छा होती कि एकदम वेगळी आणि न संपणारी गेम बनवावी. त्यानुसार त्यांनी सर्वानी काम सुरु केले आणि वर्षभरातच सर्वांसमोर हि गेम आली. यात आधी केवळ एरंगेल हा एकच नकाशा होता. नंतर मिरामार आणि सॅनहोक हे दोन नकाशे आणले आणि गेम ची रंजकता अजून वाढवली.

पबजी ला आर्थिक फायदा काय ?

इतर ऑनलाईन गेम प्रमाणे या गेम मध्ये जाहिराती येत नाहीत. पबजी ने कोणतीही जाहिरात गेम मध्ये टाकलेली नाही. पबजी ला मिळणारे आर्थिक उत्पन्न हे गेम मध्ये असलेल्या काही गोष्टी विकत घेतल्याने वाढते. आपल्या खेळाडूला एखादा नवीन ड्रेस घ्यायचा असल्यास आपण ते गेम मध्ये विकत घेऊ शकतो. तसेच पबजी मोबाईल व्हर्जन मोफत असले, तरी पबजी कॉम्पुटर व्हर्जन मोफत नाही, ते विकत घ्यावे लागते. अजून कंपनी कडून ठराविक उत्पन्नाचा आकडा प्रसिद्ध झाला नाहीये, पण अंदाजे उत्पन्न ७०० कोटी रुपये दिवसाला असे सांगितले जाते आहे. आज सर्वाधिक खेळली जाणारी गेम आणि सर्वाधिक डाउनलोड झालेली गेम, या शिवाय अनेक रेकॉर्ड या गेम ने तयार केले आहेत.

पबजी खेळण्यासाठी कोणता मोबाईल आवश्यक आहे ?

या साठी विशेष असा कोणता मोबाईल लागत नाही, सध्या बाजारात उपलब्ध असलेले १० ते १५ हजार पासून पुढे कोणतेही मोबाईल तुम्ही वापरू शकता. किमान २ जीबी ते ४ जीबी रॅम आवश्यक आहे, ग्राफिक्स कार्ड असेल तर अजून उत्तमच.उत्तम अनुभव घेण्यासाठी चांगला इंटरनेट स्पीड आणि कानात हेडफोन गरजेचे आहेत.

पबजी मध्ये गुन्हेगारीचा धोका कसा ?

पबजी मधून मोठ्या प्रमाणात काही गुन्हेगारी समोर अली नाहीये, पण काही प्रमाणात धोका आहेच. या गेम वर काही वेळा सट्टा लावला जातो, अर्थातच गेम मध्ये नाही – गेम च्या बाहेर.तसेच पबजी खेळताना आपण आपल्या सोबतच्या खेळाडूंशी बोलू शकतो , हे बोलता बोलता काही ठिकाणी भांडण होतात. अनेकदा सोबतच खेळाडू भारत बाहेरील देशाचा असतो. यातून शाळकरी मुलांना भीती दाखवणे, धमकावणे, इत्यादी अनेक प्रकार घडत आहेत.तसेच फेसबुक प्रमाणे या गेम मध्येही फेक अकाउंट चा धोका आहेच. या गेम मध्ये मुलींच्या नावाने गेम खेळणाऱ्या मुलांचे प्रमाण अधिक आहे.

पबजी खेळाचे धोके काय ?

पबजी हि गेम खूप भुरळ पडणारी आहे, आधीच या गेमची खूप प्रसिद्धी आहे, आणि हि गेम एकदा खेळली कि अजून एक दोनदा खेळू असं वाटते. जणू काही अनेक लोकांना या गेम चे व्यसन लागले आहे, अशा पद्धतीने हि गेम खेळली जाते. शाळा कॉलेज मधील विद्यार्थी, अनेक नोकरदार वर्ग, आपल्या फावल्या वेळात हि गेम खेळताना दिसतात. काही मुले खाणे पिणे विसरून तासंतास हि गेम खेळात बसतात. झोप विसरून रात्री दीड दोन पर्यंतही हि गेम ग्रुप मध्ये खेळली जाते. यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष तर होतेच, तसेच मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या हि गोष्ट योग्य नाही.

हि गेम दररोज दिवस रात्र खेळणारे अनेक जण मान आणि कंबरदुखी ने त्रस्त झाले आहेत. तसेच गमतीचा वाटेल पण अनेक जणांच्या अनुभवानुसार पबजी खूप खेळले कि तुम्ही त्यात इतके गुंतून जात, कि खऱ्या आयुष्यात पण तुम्ही पबजी खेळत आहात अशी भावना येते, समोरून येणारा माणूस शत्रू आहे कि मित्र, त्याला गोळी मारू कि मीच लपून बसून त्याच्यावर बॉम्ब टाकू, किंवा अचानक कोणतरी दारामागून चालत येऊन गोळीबार करणार आहे, अशा अनेक गोष्टी मनात येऊ लागतात.

पबजी एक उत्तम गेम आहे, पण हि गेम आपल्या शारीरिक आणि मानसिक ताकदीनुसार थोडीफारच खेळावी.

Onkar Gandhe is a Cyber Security Expert, Branding Expert, Digital and Social Media Marketing Consultant, Digital Growth Hacker, Trainer, Author, Writer, Social Worker, Professor, Keynote Speaker, and a magnanimous Entrepreneur.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!